डहाणू विभाग सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी शैलजा पाटील यांची बिनविरोध निवड

0
1608

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- डहाणू विभाग सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या नूतन कार्यकारी मंडळाची बैठक तालुका संघटनेचे सरचिटणीस बापूराव देवकर यांचे अध्यक्षेतेखाली संघटनेच्या डहाणू येथील नूतन कार्यालयात नुकतीच पार पडली या सभेत वर्ष 2019 ते 2022 या नूतन वर्षाच्या कालावधी साठी सौ शैलजा अशोक पाटील नरपड याची विभाग अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून सौ शैलजा पाटील यांना प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.

दरम्यान यावेळी इतर पदाधिकारी यांचीही खालील प्रमाणे नीवड करण्यात आली आहे. केशव जोगी पाटील उपाध्यक्ष, बाबूभाई जोंधळेकर सरचिटणीस, जयश्री ठाकूर कोषाध्यक्ष, रामदास बारी सहसचिव, जब्बीर मो शेख सह कोषाध्यक्ष, या बैठकीला संस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर माछी यांची त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव यावेळी करण्यात आला या बैठकीला तालुक्याचे अध्यक्ष श्री मारुती वाघमारे यांनी उपस्थित राहून संघटनेच्या वतीने नवीन पदाधिकारी यांचेअभिनंदन करून संघटना मजबूत करण्याचे उस्थितांना आवाहन केले शेवटी संस्थेचे नूतन सरचटणीस श्री जोंधळेकर यानि सर्व उस्थितांचे आभारव्यक्त करून सभेची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here