पालघर-योगेश चांदेकर :

पालघर-पालघर शहरातील देवीशा रोड येथील राहत्या घरी प्रतीक जैन या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना, त्याने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले.पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे आस डॉक्टरांनी घोषित केले.

प्रतीक घोलवड बोर्डी येथील महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता.त्याच्या अत्महतेच कारण अजून समजल नसून, प्रतिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पालघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here