मुंबई : योगेश चांदेकर –
जगभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना योगगुरू रामदेवबाबा यांनी स्वतःच्या शरीरात कोरोनाचा प्रवेश देऊन आठ दिवसात कोरोनामुक्त होण्याचा निर्धार दावा केला आहे.

कोरोनाची सर्वसामान्य माणसाची झोप उडविली आहे. लोकांच्या मनात असलेली कोरोनाची दहशत हद्दपार करण्यासाठी रामदेवबाबांनी हे आव्हान स्वीकारण्याचा निर्धार केला आहे. आज
त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात रामदेवबाबांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

स्वतः कोरोनाग्रस्त होऊन त्यावर प्राणायम, योगविद्या आणि आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून कशा पद्धतीने कोरोनामुक्त होता येते, हेच बाबा जगापुढे आणू इच्छितात. त्यासाठी स्वतः रुग्ण होऊन आठ दिवसात त्याच्यावर कशा पद्धतीने मात ते करतात हे सांगण्यासाठी त्यांनी कोरोनाग्रस्त होण्याचे आव्हान स्वीकारले आहे‌. हे आव्हान स्वीकारताना जगाला विश्वासार्ह वैज्ञानिक मार्ग दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

स्वतः कोरोनाचे स्वागत स्वतःच्याच शरीरात करण्याची रामदेवबाबांची भूमिका अचंबित करणारे आहे. त्यांच्या या घोषणेमुळे कोरोना उपचार संदर्भातील वैद्यकीय शाखांच्या अभ्यासकांमध्ये खळबळ उडणार आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here