मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला ‘या’ पोलीस निरीक्षकांनी दिला असा प्रतिसाद..!

0
480

नाशिक – योगेश चांदेकर:

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असतानाच समाजातील अनेक घटकांकडून माणुसकीचे दर्शन घडताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याच्या आवाहनाला रविवार दि.5/4/2020 ला संपूर्ण देशभर संपूर्ण देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक जणांनी त्यावर टिका केली तर काहीजण हा विरोध कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यात वेळ खर्च करत होते. मात्र या आवाहना नंतर अनेक जणांनी आपल्या कार्यातून बोध निर्माण होईल असं काम सुरू केलं. नाशिक येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी आगळा वेगळा आदर्श समोर ठेवला आहे.

विजय शिंदे यांनी पत्नी मनीषा, मुलगी श्रुती व मुलगा स्वरीत यांनी आपल्या स्वरीत फाउंडेशनद्वारे रोज किमान 10 गरजू अडचणीतील लोकांना किमान आठवडाभर पुरेल असं गहू, तांदूळ व इतर वस्तू देण्यास सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी काही अडचणींमुळे मदत मिळालेली नाही अशा व्यक्तींची माहिती घेत स्वतः मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. गरीबाच्या घरातील चूल पेटावी आणि त्यांच्या पोटात दोन घास जावे यासाठी विजय व त्यांचे कुटुंब काम करत आहे.

पोलीस निरीक्षक विजय शिंदे हे आपले दैनंदिन कामाबरोबरच हे काम स्वयंप्रेरणेने करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 100 पेक्षा जास्त लोकांना आठवडाभर पुरेल इतके धान्य व इतर वस्तू दिल्या आहेत. लॉक डाऊन पूर्णपणे शिथिल होऊन परिस्थिती जैसे-थे होईपर्यंत आपण हे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर धान्य वाटप करत असताना ते त्याचे फोटो काढले जाणार नाहीत याचीही काळजी घेतात. आपल्या मित्रांना देखील हे काम करण्यासाठी आवाहन केलं आहे.

“यापूर्वी असा काळ नव्हता. आसपास कित्येक गरीब घरांतली मुलं, म्हातारी माणसं अन्नासाठी भुकेली आहेत. शक्य आहे अशा सर्वांनी रोज किमान 1 गरजू कुटुंबाला आठवडाभर पुरेल असं गहू, तांदूळ व इतर वस्तू देऊन गरीबाघरी जेवणाचा दिवा लावावा. हा गरीबांच्या घरी चुलरूपी दिवा पेटत राहीला पाहिजे!”

– विजय शिंदे(पोलीस निरीक्षक – नाशिक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here