MUMBAI e NEWS:
पालघर – योगेश चांदेकर[7276644464]
डहाणू तालुक्यातील साखरा डॅमपासून अवघ्या 250 मिटर अंतरावर अनोळखी टँकरमधून घातक रसायन टाकल्याचे समोर आले आहे.
साखरा डॅम परिसरापासून ते बाजुच्या पट्यावर साधारण 1 किलो मीटर पर्यंत घातक केमिकल खाली अवैधपने विसर्जित केले असून एक किलोमीटर पर्यंत असलेल्या साइड पट्टीवर असलेली झाडे जळून गेली आहेत तर मोठ्या प्रमाणात केमिकलची दुर्गंधि येत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान हे केमिकल नेमके रात्रीच्या सुमारास टाकण्यात आल्याने अनोळखी वाहन अथवा सदर केमिकल कोणाचे आहे याबाबत समजले नसून हे केमिकल नेमके कुठल्या प्रकारचे आहे किंवा घातक आहे का? याचा शोध घेणे गरजेचे आहे. बाजूला साखरा डैम असल्याने याच डॅमद्वारे सर्वत्र पाणीपुरवठा होतो, लाखो लोक या डॅमचे पाणी पितात मात्र या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक नेमण्यात आला नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे असून येथे सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे जेणेकरुन कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही.
या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे, यामध्ये बोईसर येथील नामांकित कंपनीचा हात असल्याचे बोलले जात आहे? प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.