पालघर: ‘या’ ग्रामपंचायत हद्दीतील दारूबंदी कोणी उठवली? माजी सदस्याने मागवली ठरावाची नक्कल

0
1296

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील बेटेगावं मध्ये काही वर्षांपूर्वी संपूर्ण दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता. अनेक ग्रामस्थांनी बिअर बार सुरु करणेसाठी परवानगी मागितली असता त्यांना गावात दारूबंदी असल्याचे कारण देत परवानगी देण्यास ग्रामपंचायतने नकार दिला होता. त्याच्यानंतर ग्रामपंचायतने पुन्हा नव्याने ठराव करत दारूबंदी उठवत काही ग्रामस्थांना बिअर बार व दारू दुकान सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे गावातील दारूबंदी उठवण्याचा ठराव कोणी मांडला, त्यास अनुमोदन कोणी दिले याची नक्कल मिळावी अशी मागणी बेटेगावं येथील माजी ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतकडे केली आहे.

सध्या लॉकडाउनच्या काळात बंद असलेली ग्रामपंचायत हद्दीतील दारू दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी ज्यांनी दारूबंदी उठवली त्यांची नावे मिळावी, तसेच तो ठराव योग्यपद्धतीने करण्यात आला आहे का हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे गावातील दारूबंदी उठवण्याचा ठराव चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे असे मत माजी सदस्य सुधाकर सीताराम राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

गावात दारू सहजासहजी उपलब्ध होत असल्याने तरुणांचे व्यसनाकडे झुकण्याचे प्रमाण वाढत आहेत. अनेक संसाराची दारूने वाताहात लागली आहे त्यामुळे पुन्हा एकदा गावाच्या हद्दीत दारूबंदी लागू व्हावी अशी मागणी अनेक ग्रामस्थ करत असल्याचं त्यांनी सांगितले. याप्रश्नी कोरोना संकट टळल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here