पालघर-योगेश चांदेकर

पालघर- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९ मध्ये जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायत कुरगाव ची कोकण विभागीय समितीमार्फत आज दिनांक २०/११/२०१९ रोजी तपासणी करण्यात आली.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कोकण विभागीय समितीने ग्रामपंचायत कुरगाव ला भेट दिली. यावेळी जि. प. शाळा कुरगाव च्या प्राथमिक शिक्षिका निकिता पाटील यांनी सूत्रसंचालन करून समितीतील मान्यवरांचे स्वागत केले व ग्रामसेवक मयुर पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर समितीने ग्रामपंचायतीतील आवश्यक दप्तर पाहणी केली. समिती प्रमुख परदेशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तदनंतर ग्रामपंचायतीतील शाळा, अंगणवाडी, वैयक्तिक शौचालय, पाणी मीटर यांची पाहणी केली.
यावेळी कोकण विभागीय समिती प्रमुख सहाय्यक आयुक्त (तपासणी) कोकण विभाग नारायणसिंग परदेशी , कार्यकारी अभियंता (MJP) राजन धादवड साहेब, पं.स. पालघरचे गट विकास अधिकारी, चंद्रशेखर जगताप, लघुलेखक गणेश गांधले, जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लेखा गंगाधर जामनिक पंचायत समिती पालघरचे विस्तार अधिकारी उमतोल , जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे तज्ञ आदेश मुकणे व कनिष्ठ लिपिक श्री. संजय राऊत, BRC जगदीश पाटील आदी समिती सदस्य उपस्थित होते. उपसरपंच उदयन सावे यांनी समितीचे व उपस्थितांचे आभार मानले.

तपासणी वेळी ग्रामपंचायत कुरगाव च्या सरपंच वैशाली जिंभल, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने गावातील महिला वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here