पालघर: त्या ३ वर्षाच्या मुलीची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह

0
653

पालघर – योगेश चांदेकर:

वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या ३ वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे त्याप्रकरणी आता एक दिलासादायक बातमी आहे. सदर रुग्णाची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचे तपासणी अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे इतर कुणाला संसर्ग झाला आहे कि नाही हे समजू शकले नाही. संपर्कात आलेल्या इतर लोकांचे रिपोर्ट मिळाल्यानंतर पुढील स्ट्रॅटर्जी ठरवण्यात येईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या मुलीला करोनाची बाधा झाल्याने पालघर तालुक्यातील मासवण व काटाळे विभागातील २० डहाणू तालुक्‍यातील सुमारे ४० तर विक्रमगड येथील सुमारे १५ व्यक्तींच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्या सर्वांचेच अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यातील काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात न येता या चिमुकलीला लागण कशी झाली हे अद्यापही समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here