पालघर – योगेश चांदेकर:
पालघर शहरात मिशन कंपाउंड येथे राहणाऱ्या मुंबईत आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या 57 वर्षीय कोरोनाबाधित नर्सच्या अतिजोखमीच्या संपर्कातील १५ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे समजते आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील दलाल टॉवर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील त्या ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १५ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जवळपास ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तूर्तास दिलासा मिळाला आहे.
दरम्यान या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर १० ते १५ संशयितांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत. पालघर शहरात मिशन कंपाउंड येथे राहणाऱ्या मुंबईत आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या 57 वर्षीय कोरोनाबाधित नर्सच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या बस चालक व वाहकासहित १५ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दलाल टॉवर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती. आज त्या ४ जणांच्या अतिजोखमीच्या संपर्कात आलेल्या १५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.