पालघर: सलाम तुझ्या रुग्णसेवेला; ४५ दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत!

0
349

पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील कु. निकिता संजय मोरे ही मुंबई येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये नर्स या पदावर कार्यरत असणारी निकिता कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करत आहे. निकिता कोरोना ग्रस्तांना सेवा देण्यासाठी गेल्या ४५ दिवसांपासून घरी न येता हॉस्टेलमध्येच राहत आहे. बोईसर येथे एकत्र कुटुंबात राहणाऱ्या निकिताच्या घरी आई, वडील, भाऊ, काका, काकी, आज्जी, आजोबा असा परिवार आहे. त्यामुळे रोज घरी येण्याऐवजी निकिताने घरातील लोकांना समजावत हॉस्टेलमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यागभावनेतून कार्यरत निकिताच्या रुग्णसेवेला मुंबई ई न्यूजचा सलाम!

सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालय प्रशासनाकडून PPE किट तसेच अन्य अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारचे जेवण व इतर सर्व सहकार्य मिळत असल्याचे निकिताने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सोबतच नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन निकिताने मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून केले आहे.

स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक आरोग्य सेवेतील कर्मचारी कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता घरात बसून प्रशासनाला सहकार्य करणे हेच आजच्या घडीला राष्ट्रीय कर्तव्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here