पालघर: जिल्ह्यात फिवर क्लिनिकची सुरवात; जाणून घ्या संपर्क क्रमांक!

0
489

पालघर – योगेश चांदेकर:
देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे त्याच बरोबर आपल्या जिल्ह्यात देखील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासन हा संसंर्ग रोखन्यासाठी विविध उपाययोजनेची अंमलबजावणी करत आहे. व्यक्ती कोरोना बाधित झाल्यावर सर्वसामान्य लक्षणें दिसून येतात. यामध्ये ताप, खोकला, सर्दी अशा लक्षणांचे निदान करून त्यावर उपचार करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील विविध भागात फिवर क्लिनिक स्थापन करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागातील रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज माहिती दिली.

सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे ज्या-ज्या रुग्णामध्ये तीव्र प्रमाणात जाणवत असतील अशा रुग्णाचे घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या उपाययोजनेच्या माध्यमातून कोव्हीड -19 चा रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णावर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे. या मुळे इतर सामान्य आरोग्य असणाऱ्या नागरिकांना होणारा कोरोना विषाणूचा संसंर्ग आपण रोखू शकू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला

जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले फिवर क्लिनिक:

 • मुलांचे वसतीगृह जव्हार – डॉ.संजय कवळे -9921399242
 • मुलींचे वसतीगृह जव्हार – डॉ. संजय कावळे -9921399242
 • भारती विद्यापीठ – डॉ.संजय कवळे -9921399242
 • उधवा आश्रमशाळा, तलासरी – डॉ.
 • आलोक विश्वकर्मा – 9029134385
 • संतोषी आश्रमशाळा, डहाणू – डॉ. रूपटक – 9226180059 –
 • साखरे आश्रमशाळा, विक्रमगड – डॉ. विजय काळभांडे – 9020494981
 • साजन रिसॉर्ट, विक्रमगड – डॉ. विजय काळभांडे – 9020494981
 • आय.टी.आय, मोखाडा – डॉ. दत्तात्रय शिंदे – 8806111778
 • आयडीयल वसतिगृह, वाडा – डॉ. प्रदीप जाधव – 7045272891
 • साईबाबा हौसिंग कॉलनी, पाणेरी माहीम रोड, पालघर- डॉ. मंगेश सांखे -9226108151
 • तहसीलदार कार्यालय, मोखाडा – डॉ. महेश पाटील – 9922402114
 • नंडोरे आश्रमशाळा, पालघर – डॉ. दिनकर गावित – 9272688375
 • रेवेरा वसतिगृह, विक्रमगड – डॉ. रामदास मराड – 9260633361
 • जीवन विकास विद्यालय, पालघर – डॉ. दीपक वाणी – 98236611164
 • तवा आश्रमशाळा, तवा – डॉ. बालाजी हगणे – 9881269912
 • मुकबधीर विद्यालय, जव्हार- डॉ. रामदास मराड – 9260633361
 • पाली आश्रमशाळा, वाडा – डॉ. प्रदीप जाधव – 7045272891
 • आय. टी. आय विक्रमगड – डॉ. काळभांडे – 8369451804
 • वेदांत संस्था वैद्यकीय महाविद्यालय व्दितीय – डॉ. अमोल – 8855869502
 • दयानंद हॉस्पिटल, तलासरी – वरिष्ठ मोनिका मस्करनास – 0251 -220112
 • आयडियल रुग्णालय, वाडा – डॉ. प्रदीप जाधव – 7045272891
 • ग्रामीण रुग्णालय, पालघर – डॉ. डी.डी. गावित – 9272688375
 • ट्रॉमा केअर सेंटर, डहाणू – डॉ. बालाजी हेगणे – 9881269912

नागरिकांना ताप, खोकला, सर्दी अशा प्रकारची लक्षणें आढळून आल्यास त्यांनी वरील नमूद केलेल्या नजीकच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांच्या संपर्क क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here