पालघर: डहाणूतील एका डॉक्टर तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

0
334

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील एका खासगी रुग्णालयात आयसीयू डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर डॉक्टर तरुण हा वेदांत हॉस्पिटल येथेच वसतिगृहात निवासस्थानास आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याची कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here