पालघर-योगेश चांदेकर:

पालघर- वसई -विरार महानगरपालिकेच्या हद्दीत परदेशातून प्रवास करून आलेल्या 16 जणांची तसेच ग्रामीण भागातील 12 जणांची तपासणी करण्यात आली असून या पैकी कोणत्याही परदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्ती मध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले नाहीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी कोरोना बाबत जिल्ह्यातील स्थिती बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

ज्या व्यक्तीला संसर्गाची बाधा झाली त्या व्यक्तीस विलगीकरण (आयसोलेशन) या ठिकाणी उपचारासाठी ठेवण्यात येते. जे रुग्ण संशयीत आहेत त्यांना अलगीकरण (क्वॉरेंटाईन) या ठिकाणी निरिक्षणासाठी ठेवण्यात येते. वसई -विरार महानगरपालिकेच्या हद्दीत अलगीकारणासाठी 200 व्यक्तीची क्षमता असलेली जागा उपलब्ध झाली असून ग्रामीण भागासाठी 85 क्षमता असलेलं ठिकाण निश्चित करण्यात आली आहे. विलगीकरणासाठी शहरी भागामध्ये 28 तर ग्रामीण भागात 40 व्यक्तीच्या क्षमता असलेले रुग्णालय उपलब्ध आहेत. अलगलीकरणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णालयाची क्षमता पुढील प्रमाणे आहे. टीमा रुग्णालय, बोईसर-40, ग्रामीण रुग्णालय पालघर-10, जव्हार रुग्णालय-10, प्राथमिक आरोग्य केंद्र एडवन-20, उपकेद्र शेवते-10,उपकेंद्र हिरडपाडा जव्हार -10, डोलारपाडा तलासरी- 05, फुलपाडा वसई-200.

विलगीकरणासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची क्षमता पुढील प्रमाणे आहे. ग्रामीण रुग्णालय पालघर-10 खाटा, उपजिल्हा रुग्णालय डहाणू -10 खाटा, उपजिल्हा रुग्णालय जव्हार -10 खाटा, उपजिल्हा रुग्णालय वाडा -10 खाटा, उपजिल्हा रुग्णालय वैतरणा वसई-20 खाटा, उपजिल्हा रुग्णालय बोळींज विरार -8 खाटा.

नागरिकांनी सामुहीक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे. COVID-19 या आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण देण्यासाठी तसेच हात स्वच्छ धुणे, खोकताना- शिंकताना घ्यावयाची काळजी, खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी कोरोना संशयीत रुग्ण आढळल्यास जिल्हा शल्याचिकित्सक डॉ. कांचन वानेरे 9890906617, जिल्हा आरोग्य अधिकारी (जि.प.) डॉ. दयानंद सुर्यवंशी-9004814412, डॉ. स्मिता वाघमारे-9987240750 या भ्रमणध्वनीवर त्वरीत संपर्क साधावा.

सद्यस्थितीत शहर-जिल्ह्यात ‘करोना’चा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रुप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या’ घाबरू नका पण सतर्क रहा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी केले आहे.

पालघर जिल्हा मुंबई शहराजवळ असल्यामुळे अनेक पर्यटक पालघर जिल्ह्यामार्गे प्रवास करतात, अथवा वास्तव्यास असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विषाणूंचा फैलाव होऊ नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मास्कची जादा दराने विक्री, औषधांची साठेबाजी केल्यास तात्काळ कारवाई करण्याचे सूचना संबधित विभागाला दिल्या आहेत. सेवाभावी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. पोलीस यंत्रणेने समाज माध्यमातून अफवा अथवा गैरसमज पसरविणारेशोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांचे प्रबोधन करावे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

जनतेमध्ये भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये म्हणून व्यापक प्रचार, प्रसिध्दी, जनजागृती केली जात आहे. शाळा अंगणवाडी मध्ये हात धुण्याची प्रात्यक्षिके करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आजारासंबंधी प्रबोधनपर फलक, होर्डीग लावण्यात आले आहेत. चित्रपटगृह, केबल नेटवर्कद्वारे माहिती दिली जात आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बँक, एटीएम आदी ठिकाणे वारंवार निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सद्यस्थितीत शहर-जिल्ह्यात ‘करोना’चा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रुप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या’ घाबरू नका पण सतर्क रहा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी केले आहे.

यात्रेनिमित्त जमणाऱ्या जनसमुदायमध्ये कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी श्री. जगदंबा उत्सव (बोहाडा) ता. मोखाडा व श्री. जगदंबा उत्सव (बोहाडा) मौजे वेहेलपाडा (विठ्ठलनगर) ता. विक्रमगड येथील यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here