प्रशासनाची दिशाभूल केल्याने कारवाईची नोटीस

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- जगभरात कोरोनो व्हायरसची भीती निर्माण झाल्यानंतर सोशियल मीडियाच्या माध्यमातून अफवांच्या चर्चांना उधाण आलं. याचा थेट परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला. त्यामुळे चिकन खाण्याकडे खवय्यांनी पाठ फिरवल्याने चिकनचे भाव बाजारात घसरले. त्यामुळे या व्यवसायाला मोठी घरघर लागली.

याचाच धसका घेऊन डहाणू तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक संदीप भाटलेकर यांनी जवळपास नउ लाख उबविलेली अंडी आणि जवळपास पावणे दोन लाख नवजात जिवंत पिल्ल खड्डे खोदून जेसीबीच्या सहाय्याने पुरून टाकल्याची बाब समोर आली. तश्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या. याबाबतची प्रतिक्रिया भाटलेकर यांनी प्रसार माध्यमांना दिल्याही! परंतु त्यांनी नवजात जिवंत पिल्लांना पुरल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या समोर आल्यावर त्यांना पशु संवर्धन विभागाकडून जाब विचारण्यात आल्यावर त्यांनी सदरची बाब लपविण्यासाठी आम्ही असा प्रकार केलाच नाही असे दिशाभूल करणारे पत्र दिल. त्यामुळे सध्या भाटलेकर संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून पशु संवर्धन विभागाकडून कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.

या सर्व प्रकाराने सोशियल मीडियाच्या माध्यमातून उठणाऱ्या अफवांचे असेही ‘साईड इफेक्ट’ समोर येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here