MUMBAI e NEWS :
निधीची काळजी करू नका, तो उभा करु. आधी ग्रामीण आरोग्य केंद्राच्या विकासासाठी सर्वंकष आराखडे तयार करा. ग्रामीण भागातील गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा देऊन दिलासा द्यावा, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
अकोला जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यावेळी कडू बोलत होते.
प्रशासन, लोकप्रतिनिधी व लोकसहभाग यांच्या सहभागाने होणारे काम हे अचूक असते, त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्यातील ग्रामीण वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करूयात, असे यावेळी कडू म्हणाले.
औषधांचा पुरवठा वेळच्यावेळी काटेकोरपणे करण्याचे आदेशही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here