कोणत्याही अटी, निकष न लावता सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने पाळावे, याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी २८ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधव, महिला बचत गट या सर्वांचे आभार भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मानले.

समरजितसिंह घाटगे यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे, “मोर्चा होऊन १५ दिवस झाले तरीही सरकारने याबद्द्ल कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेतकरी, महिला बचत गट यांचे नुकसान होत असून त्यांना कोणतेही नवीन कर्ज मंजूर होत नाही त्यामुळे आम्ही एक नवी मोहीम हाती घेतली आहे.
सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः राज्यपालांना पत्र लिहावं त्यामध्ये आपला सात बारा कोरा झाला पाहिजे, नवीन पीक कर्ज मंजूर होण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच महिला बचत गटांना या कर्जमाफीमध्ये फायदा मिळत नाही.”

समरजितसिंह घाटगे यांनी असे आवाहन केले आहे कि राज्यपालांच्या नवे लिहलेले हे पत्र भाजपचे तालुका अध्यक्ष किंवा कार्यकर्ते यांच्याकडे देण्यात यावेत किंवा आपली माहिती ७४४७६४९५५१ या नंबरवर संपर्क करून सांगावी. मोठ्या प्रमाणात पत्र राज्यपालांना पाठवू शकलो तर राज्यातील अशी पहिली मोहीम ठरेल जिची सुरुवात कोल्हापुरातून होईल. मोठ्या प्रमाणावर पत्र राज्यपालांच्यापर्यंत पोहचली तर जे कर्जमाफीचे चुकीचे निकष बदलण्यासाठी स्वतः राज्यपाल पुढाकार घेतील आणि स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलतील. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यासाठी कोल्हापूर भाजपकडून एक मोठी मोहीम हाती घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here