पालघर: तारापूर वसाहतीतील कंपनीत स्फोट; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

0
379

पालघर – योगेश चांदेकर:
तारापूर औद्योगिक वसाहतीतील गॅलेक्सी सरफॅक्टटन्स या कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. गॅलेक्सी सरफॅक्टटन्स या तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने अधिकची जीवित हानी टळली. दरम्यान स्फोट घडला तेव्हा कंपनीत काम सुरु होते का बंद हे समजू शकले नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एम-३ मध्ये गॅलेक्सी सरफॅक्टटन्स ही कंपनी आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास इथे भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here