MUMBAI e NEWS :
22 जानेवारी रोजी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये नाईट लाईफ बाबत पहिल्यांदा प्रस्ताव येणार आहे. यावेळी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यास वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे नाईट लाईफ अंतर्गत चोवीस तास सुरु ठेवता येणार आहेत. महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु करत आहेत. ही नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे.


मात्र या नाईट लाईफवर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. मात्र नाईट लाईफ प्रोजेक्टला प्रकाश आंबेडकारांचा पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नाईट लाईफ प्रोजेक्टला विरोध करणार्यांचा आंबेडकार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी नाईट लाईफच्या जगातच मोठा झालो आहे. ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here