पालघर : योगेश चांदेकर :
हिंगणघाट येथील शिक्षिकेच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला देहदंडाची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करून हिंगणघाट येथील थरकाप उडवणाऱ्या घटनेतील तरुणीचा मृत्यु झाल. सुन्न आणि अपराधी वाटत असल्याचे म्हटले आहे. इतक्या शतकांत आपण स्त्री ला राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरंक्षण मंत्री पाहू शकलो पण सामान्य स्व-कर्तृत्व करणाऱ्या स्त्री ला सुरक्षा नाही देऊ शकलो.. देहदंडाची दिली पाहिजे त्या क्रूर अहंकारी तरुणाला तिच्या परिवाराचे दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे, ते कधीही न भरून येणारे आहे. त्यांच्या आणि समाजाच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here