पालघर-योगेश चांदेकर

पालघर-वीट भट्टीवर करण्यासाठी आगाऊ रक्कम घेऊनही कामावर न गेल्याचा राग मनात धरून डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्या प्रकरणी आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे.

मयत आकाश मांजे रा.खालिद ता भिवंडी याने भिवंडी येथील एका वीट उत्पादकाकडून आरोपी प्रल्हाद गावित याच्या हस्ते 15 हजार रुपये बयाना घेतले होते मात्र तो तिथे कमला न जाता त्याने दुसरीकडील काम स्वीकारले होते. याचा मनात राग धरून मयत हा गौरपूर येथे त्याच्या सासुरवाडीला लग्न कार्यासाठी आला असता मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याचा पाठलाग करून येथील गणेश मंदिरा जवळ त्याला गाठून त्याच्या डोक्यात कोयत्याने घाव घालून त्याला ठार केले.

बुधवारी सकाळी पोलीस पाटील यांच्या कडून खबर मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली व चौकशीअंती आरोपी गौरपूर येथील डोंगरावर लपला असल्याची माहिती मिळाल्याने अवघ्या दोन तासातच आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here