पालघर: एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ..!

0
420

पालघर – योगेश चांदेकर:

बोरीवलीवरुन पालघर येथे येणाऱ्या 1.30 च्या बसमध्ये सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवत एकाच सीटवर दोन दोन कर्मचारी प्रवास करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोरीवलीवरुन पालघरला मुंबई महापालिकेत अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना घेऊन जात असलेल्या MH20 BL2434 या एसटी महामंडळाच्या बसमधून अत्यंत बेजबाबदारपणे ही प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या 7-8 दिवसांपासून प्रवासी कर्मचारी असा जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं काही जणांनी सांगितले आहे.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या पालघर येथील मिशन कंपाउंड परिसरातील एका नर्सला कोरोना लागण झाल्याने तिच्या 11 सहप्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले होते. अशा घटनानंतर तरी महामंडळ प्रशासनाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित आहे. राज्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि आरोग्य प्रशासन कार्यरत असताना काही लोकांना अजूनही याचं गांभीर्य नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.

सदर घटनेबाबत एसटी महामंडळ पालघर व्यवस्थापक नितीन चव्हाण यांना विचारले असता “एका सीटवर एक याप्रमाणेच वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना जर प्रवासी ऐकत नसतील तर वाहक चालक यांनी आणि जर वाहक व चालक ऐकत नसतील तर प्रवाशांनी बस न हलवता तक्रार करायला हवी होती. सदर प्रकाराची माहिती घेतली आहे यांतील दोषींवर कारवाई करण्यात येईल” अशी प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here