कोरोना संचारबंदी; वाहनाअभावी बाईकवरूनच मृतदेह घरी

0
438

पालघर – योगेश चांदेकर

पालघर- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू असून या लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. वाहनाअभावी बाईकवरून रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. पालघर जिल्ह्यातील चिंचारे येथील एका इसमाला २४ मार्चला सर्पदंश झाल्याने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. मूळचे चिंचारे येथील असलेल्या लडका वावरे यांना कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार पूर्ण झाल्याचं सांगत २५ मार्चला डिस्चार्ज दिला होता.

आज सकाळी त्यांना त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यास वाहनाची उपलब्धता नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटरसायकलवरूनच घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अर्ध्या रस्त्यात त्यांचा मोटरसायकलवरच दुर्दैवी असा मृत्यू झाला असून कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून केला जातोय.

“सदर रुग्णाला सर्पदंश झाल्याने २४ तारखेला दाखल करणेत आले होते. त्यावर योग्य तो उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना अतिरक्त दाबाचा त्रास होता त्यावरही उपचार देण्यात आला होता मात्र त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अहवाल प्राप्त झाल्याखेरीज सांगता येणार नाही.” 
प्रदीप धोडी – वैद्यकीय अधिक्षक, कासा उपजिल्हा रुग्णालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here