पोलीस, डॉक्टर, नर्सेस यांना कोरोना भत्ता द्यावा; काँग्रेस प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांची मागणी

0
500

मुंबई – योगेश चांदेकर:

महिनाभरापेक्षा जास्त दिवसांपासून आपला जीव धोक्यात घालुन डॉक्टर, नर्सेस व पोलीस हे २४ तास कोरोनाशी लढत आहेत. अशा कठीण काळात त्यांना पगारवाढ देणे शक्य नसेल तर निदान “कोरोना भत्ता” म्हणून काही भरीव रक्कम देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना पत्र लिहून डॉ. वाघमारे यांनी हि मागणी केली आहे.

कोरोना भत्ता दिल्यास कोरोना योध्यांचे मनोबल वाढेल त्यांच्या कुटुंबियांना देखील बरे वाटेल. तसेच यामुळे कोरोनाची लढाई देखील ते जास्त जोमाने लढतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून सरकार यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशामध्ये सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यानेच हि मागणी केल्याने सरकार याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here