पालघर: वाणगावात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी

0
428

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. दरम्यान पालघर जिल्हा कोरोना रेड झोन जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे असे असताना डहाणू तालुक्यातील वाणगाव रेल्वे फाटक येथे जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मोठ्या संख्येने खरेदीसाठी आलेल्या लोकांमुळे गर्दी झाली असून नियमांचे पालन होताना दिसत नाही.

वाणगावात सोशल डिस्टंसिंग राखत ठराविक वेळेत किराणा दुकान सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासूनच खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुकानदारांनी वारंवार सूचना देऊन देखील लोक ऐकताना दिसत नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

“पोलीस प्रशासन जीवतोड मेहनत घेत असताना नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे. पालघर जिल्ह्यातील रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर नागरिकांनी खबरदारीच्या सूचनांचे पालन नागरिकांनी करायला हवे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावे” – पिंटू गहला, उपसभापती पंचायत समिती डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here