पालघर-योगेश चांदेकर

पालघर-आशा फाउंडेशन इंडियातर्फे, 11 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत महाविद्यालयीन व खुल्या गटातून के.एल.पोंदा हायस्कूल, डहाणू. तालुका- डहाणू, जिल्हा- पालघर येथील सहाय्यक शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तर डॉ. अनुपमा जाधव यांचा द्वितीय क्रमांक आला आहे.

सदर स्पर्धेसाठी “माझा मोठं होण्याचा प्रवास” हा निबंधाचा विषय होता. निबंध लिहीण्यासाठी नऊशे शब्दमर्यादा होती. सदर निबंध स्पर्धेत चव्हाण यांनी मराठी माध्यमात शिक्षण घेत असताना इयत्ता आठवीत इंग्रजी विषयात नापास होऊनसुद्धा इंग्रजी विषयात जागतिक विक्रम करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रभावी शब्दात आणि आपल्या सुंदर हस्ताक्षरात मांडला आहे. याआधी त्यांचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सलग दोनदा म्हणजेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2017- 18 व 2018 -19 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. डॉक्टर जाधव या साहित्यिक आहेत.त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान अनुपमा जाधव या , जेष्ठ साहित्यिका, शिक्षिका, निवेदिका,असून त्यांची आजवर समुद्र संगीत,वहिवाट, हे काव्यसंग्रह प्रकाशीत तर अनुबधं हा कथा संग्रह प्रकाशित झाला आहे. डॉ. अनुपमा जाधव यांना शैक्षणिक , सामाजिक , साहित्यिक कार्यासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हिंदी , अहिराणी , मराठी , गुजराती भाषेतून त्यांचे साहित्य लेखन प्रकाशित आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here