सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या पहिल्या “LAWgical” या लाॅ- मॅगेझिनचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

0
1361

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-पालघर जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेल्या सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाने आपली यशस्वी घौडदौड लाॅ मॅगेझिनच्या रूपाने प्रसिध्द केली. नानाविवीध प्रकारची कायदेविषयक शिबीरे, अभिरूप न्यायालय उपक्रम, विविध क्षेत्र भेटी त्याचसोबत सामाजिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा उपक्रमांचा सुंदर मिलाप म्हणजे महाविद्यालयाचे LAWgical मॅगेझिन. महाविद्यालयाचेप्राचार्य, प्राध्यापक व विधी शाखेचे विद्यार्थी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने लाॅ मॅगेझिनची संकल्पना साकारली गेली हे विशेष.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिलेले प्रोत्साहन आणि तज्ञांचे सखोल मार्गदर्शन हे चित्रबद्ध स्वरूपात प्रदर्शित होणे हा आमच्यासाठी आनंदाचा आणि भाग्याचा क्षण असे विद्यार्थ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी लिहिलेले विविध विषयांवरचे स्तंभलेख तसेच विधीक्षेत्रातील घडामोडींची विश्लेषणात्मक सादरीकरण या सर्वसमावेशक मॅगेझिनचे अनावरण सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात झाले.

विधी महाविद्यालय समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, खजिनदार हितेंद्र शाह,सहसचिव जयंत दांडेकर, काॅलेज डेव्हलपमेंट समितीचे इक्बाल धनानी,सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण सावे,विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा, ज्येष्ठ विधिज्ञ श्री विजय जोशी, सहाय्य क सरकारी वकिल मुंबई उच्च न्यायालय सौ. गितांजली शिंदे, पालघर जिल्हा चिल्ड्रेन वेलफेअर कमिटी, संचालक सौ. शारदा शिंदे तसेच महाविद्यालयाचे शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या “LAWgical” मॅगेझिनचे प्रकाशसनाचा सोहळा उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here