पालघर: ‘लेडी सिंघम’ सिद्धव्वा जायभाये यांची धडक कारवाई ; गावठी बंदुकीसह एकजण ताब्यात..!

0
484

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन हद्दीतील बापूगांव फणसवाडी येथील योगेश सुभाष कुरकुटे, वय २७ वर्ष, याच्याकडे गावठी बंदूक असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी ‘लेडी सिंघम’ सिद्धव्वा जायभाये यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. यामध्ये सिंगल बारची चार फूट साडेपाच इंच लांबीची गावठी बंदूकीसह आरोपीस ताब्यात घेतले.

काही दिवसांपूर्वी आरोपीने हवेत गोळी झाडल्याने त्याच्याकडे अशी गावठी बंदूक असल्याचे पोलीस खबरीस समजले होते. कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी सिद्धव्वा जायभाये यांच्यासह पोलीस नाईक नरेश जनाठे, पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत पाटील यांनी या कारवाईत महत्वाची कामगिरी बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here