MUMBAI e NEWS :
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणामध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे यासाठी दबावतंत्र वापरणाऱ्या सेनेतील पदाधिकार्‍यांची हकालपट्टी काल करण्यात आली. शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगेंची हकालपट्टी करण्यात आली आहे तर शिवसेना प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची निवड करण्यात आली.

मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सोलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यासाठी नूतन प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह अनेक शिवसैनिक मातोश्रीजवळ दाखल झाले होते. पत्रकारांशी बोलताना पुरुषोत्तम बरडे म्हणाले की,’मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी तानाजी सावंत यांनी वाद-विवाद केला. मंत्रिपदासाठी मी पुन्हा मातोश्रीवर येणार नाही अशा प्रकारचे खोटे विधान व बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. या मातोश्री ला चॅलेंज करणारा कुणी माय का लाल अजून जन्माला आला नाही. स्वतःचं नेतृत्व मोठं करण्यासाठी महाराष्ट्रात तानाजी सावंत यांनी फसवेगिरी केली.

हा तानाजी सावंत नाही तर सूर्याजी पिसाळ आहे माझे ओपन चॅलेंज आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन धनुष्यबाणाचे चिन्ह सोडून निवडून येऊन दाखवा उद्धव साहेबांविषयी मग्रुरीची भाषा वापरणाऱ्या तानाजी सावंत यांचा आम्ही निषेध करतो असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. इकडे सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here