पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात एक गंभीर

0
408

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई अहमदाबाद महामार्गावर चिंचपाडा येथे डिझेल वाहून नेणारा टँकर पलटी होऊन अपघात घडला आहे. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला असण्याची शक्यता आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे तर दुसऱ्या व्यक्तीस किरकोळ जखम झाली असल्याचे समजते आहे.

टँकर पलटी झाल्याने काहीप्रमाणात डिझेलची गळती सुरू झाल्याने भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र मदत कार्य वेळेत पोहोचल्याने मोठा धोका टळला. दुर्घटना स्थळी क्रेन पोहोचले असून टँकर उचलण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here