पालघर – योगेश चांदेकर
खारले पाडा मोरेकुरण येथील फॉरेस्टच्या जागेत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने खासदार श्री राजेंद्र गावितांच्या प्रयत्नाने ईको टुरीझमच्या माध्यमातून पालघर च्या जनते साठी ५० एकरात भव्या गार्डन तयार करणार आहेत, त्या साठी आज त्यानी फॉरेस्ट ऑफीसराची मीटिंग पालघर येथे घेतली, मीटिंगला उप वनरक्षक डहाणु श्री विजय भिसे, वन क्षेत्रपाल पालघर पंकज पवार उपस्थित होते.


ह्या गार्डन मध्ये जॉगीग ट्रॅक, ओपन जिम, खुले नाट्यगृह, बोटॅनिकल गार्डन, लॅडस्केप गार्डन्स अशे अनेक प्रकल्प समाविष्ट असतील. त्यासाठी सुरवातीला खासदार फंड ही देण्यात येणार आहे असे खासदार राजेंद्र गावित म्हणाले, लवकरच ह्याचा आराखडा तयार करण्यासाठी बैठक आयोजीत केली जाईल अशी माहीती गावितानी दिली .
ह्या बैठकीला शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे, पालघर नगरपरिषद बांधकाम सभापती सुभाष पाटील, भाजपा गटनेते भावानंद संखे, शिक्षण सभापती चंद्रशेखर वडे, नगरसेवक तुशार भानुशाली, शहर अध्यक्ष भूषण संखे, सुनील महेंद्रकर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here