‘शिवथाळी’साठी आधार कार्ड सक्तीचे, जुळेल फोटो तरच मिळेल जेवण!

0
429

MUMBAI e NEWS:

‘शिवथाळी’ हि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्यात येणार आहे. लाभार्थ्याचा आधारावरील फोटो जुळला, तरच दहा रुपयात शिवथाळी मिळणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच 26 जानेवारीपासून राज्यात ‘शिवथाळी’ योजना कार्यान्वित होणार आहे.

दरम्यान, गरीबाला जेवू घालताय, का त्याची थट्टा करताय? असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारला विचारला आहे. सर्वांना बिनशर्त जेवण मिळालेच पाहिजे, अशी मागणी देखील कदम यांनी केली आहे. दरम्यान सरकारवर होणाऱ्या टिकेला सरकारमधील एखाद्या मंत्र्याने पहिल्यांदाच अधिकृतपणे उत्तर दिलं आहे. “शिवथाळी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. गरिबाला याचा लाभ मिळावा तो मिळत असताना कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये. अतिशय पारदर्शक पद्धतीने हि योजना राबवली जावी यासाठी या अटी शर्थी असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here