पालघर-योगेश चांदेकर

पालघर- केळवेरोड येथे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या कार्यकारणी सदस्यांच्या सभेत नवीन  मंडळाची नियुक्ती करण्यात आली आणि पदभार कार्यक्रम संपन्न झाला.

संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री .नागदेव पवार ह्यांची नियुक्ती करण्यात आली व  त्यांना संस्थेचे सचिव श्री . दयानंद पाटील ह्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तर संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून श्री .सतिश गावड ह्यांची नियुक्ती करण्यात आली व संस्थेचे सहसचिव श्री .प्रथमेश प्रभुतेंडोलकर ह्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. तसेच इतर कार्यकारणी सदस्यांनीही नविन पदभार स्विकारला. सर्व कार्यकारणी सदस्यांना योग्य ती संधी मिळावी व त्यांच्या अनूभवाचा फायदा संस्थेला व पर्यायाने सामान्य प्रवाशांना घेता यावा ह्या उद्देशाने सर्वानूमते हा फेरबदल करण्यात आल्याचे संस्थेचे माजी उपाध्यक्ष श्री. महेश पाटील ह्यांनी नविन कार्यकारणी मधे सल्लागार पदाचा पदभार स्विकारताना सांगितले. तसेच संस्थेची वाटचाल योग्य त्या दिशेने सुरु असून प्रवाशांच्या समस्यां सोडविण्यासाठी संपुर्ण कार्यकारणी आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून वेळात वेळ काढून कष्ट घेत असल्याचे संस्थेचे माजी खजिनदार श्री. हितेश सावे यांनी नविन कार्यकारणीमधे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सांगितले. संस्थेचे माजी अध्यक्ष श्री.विजय शेट्टी उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी नवीन सदस्यांना पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा देत संस्थेच्या पुढच्या प्रवासात संस्थेबरोबर खंबीर पणे उभे राहण्याची विनंती संस्थेचे सहसचिव श्री प्रथमेश प्रभूतेंडोलकर ह्यांनी केली आणि संस्थेच्या स्थापनेत दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेची नविन कार्यकारणी पुढिल प्रमाणे :-

१. नागदेव पवार – अध्यक्ष

२. सतीश गावड – उपाध्यक्ष

३. दयानंद पाटील – सचिव

४. राजन पाटील- खजिनदार

५. प्रथमेश प्रभूतेंडोलकर- सहसचिव

६. चैतन्य पाटील- सहखजिनदार

७. हितेश सावे- जनसंपर्क अधिकारी

८. महेश पाटील- सल्लागार

९. सखाराम पाटील- सहसल्लागार

१०. मंदार पाटील- कार्यकारणी सदस्य

११. सौ. रुत लिंगायत- महिला संघटक व प्रतिनिधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here