पालघर: कोरोनाशी संघर्षात झटतोय लावून तन मन धन गरजूंच्या मदतीसाठी सक्रिय योगेश बन..!

0
525

पालघर – योगेश चांदेकर:

‘मानवता हाच सर्वात मोठा धर्म’ हा आदर्श घेत समाजसेवक योगेश सुभाष बन हे कोरोना संकटात तन मन धन लावत समाजकार्य करत आहेत. लोकांना मदत करणे थांबवू नका कारण केवळ तुम्हीच त्यांची शेवटची आशा असू शकता असं आवाहनही त्यांनी इतर सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना केलं आहे. आजपर्यंत योगेशने 2000 हून अधिक कुटुंबे आणि 6000 पेक्षा जास्त लोकांना मदत केली आहे. जव्हार, मोखाडा, मनोर, बोईसर, पालघर, घोलवड, ​​ कोसबाड, तलासरी येथे हजारो किलो गहू तांदूळ, डाळ, भाज्या वितरित केल्या आहेत. एवढंच नाही तर वैद्यकीय उपचारासाठी सुमारे २ लाख रुपये रोख रक्कम मदत केली आहे.

कोरोनाच्या संकटात लोकांचे मनोधैर्य खचू नये यासाठी मदत देण्यासाठी एखाद्या ठिकाणी पोहोचल्यानंतर लोकांची मानसिकता सकारात्मक राहावी यासाठी आपुलकीचे मार्गदर्शनपर चार शब्द खचलेल्यांना मोठा आधार देऊन जातात. वानगाव कोमपाड्यातील शेकडो लोकांना मदत करण्यासाठी वेगळी कल्पना घेऊन आला. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणाऱ्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, फेस मास्क, वैद्यकीय उपकरणे, सॅनिटायझर्स, मुखवटे गरजू लोकांना वाटत, संकट गंभीर असले तरी मदतकार्य पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी खंबीर असल्याचं तो दाखवून देत आहे.

“धर्माच्या पायावर मदतीचे वाटप करू नका कारण काही लोक हे करत आहेत. जेव्हा मी हजारो गरजू लोकांकडे पोहोचतो तेव्हा मी त्यांच्या धर्म किंवा नावाबद्दल त्यांना कधीही विचारले नाही. शुद्ध अंतःकरणाने त्यांना मदत करा. सर्वांच्या निर्धाराने कोरोनाचे हे संकट लवकरच जाईल पण यामध्ये मानवता धर्म जपण्याची व वाढवण्याची आपली जबाबदारी आहे.” – योगेश बन, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here